Slider Image
ताजी बातमी

गावाविषयी माहिती

कोळगाव हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रभू श्री.राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले  प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.सोनगाव गावात दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे कोळगाव या गावाला पूर्वी फकीरवाडी असेही संबोधले जात होते, सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २५५६ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे ३ व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०१६ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत कोळगाव ने खास ग्रामस्थांसाठी RO प्लांट बसविलेला असून गावातील १००% कुटुंब RO च्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच  गावात १८ मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, , कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात.  ऊस कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात

कोळगाव ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सोनगाव गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये  कोळगावला विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत सन २०१३-२०१४ पारितोषिक प्राप्त गाव बक्षीस रुपये-३ लक्ष रुपये  प्राप्त झाला असून स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका  पातळीवर मिळाला आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ७ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

कोळगाव गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

कोळगाव हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २१ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ९५८.७२ हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये  वार्ड आहेत. एकूण ४६० कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २५५६ आहे. त्यामध्ये १३३४ पुरुष व १२२२ महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत अवघ्या १ किमी अंतरावर गोदावरी नदी असून  ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

कोळगाव गाव  कांदा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

कोळगाव गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून  ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

कोळगाव च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

वर्ग संख्या
पुरुष १३३६
स्त्री १२२२
एकूण २५५६

संस्कृती व परंपरा

कोळगाव गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात बालकदास बाबा व खंडेराव  यात्रा हि मोठ्या उत्साहात भरवली जाते त्यात प्रामुख्याने मिरवणूक हे आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे कोळगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

मारुती  मंदिर – गावातील प्रमुख जागृत मारुती मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

शेती क्षेत्र व – कोळगाव उस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.

जवळची गावे

कोळगाव निफाड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे कोळगावशि सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

खेडलेझुंगे,कानळद ,रुई  हि गावे कोळगाव च्या आसपासची प्रमुख गावे आहेत.

ग्रामपंचायत प्रशासन


अ. क्र. नाव पद मोबाईल नं.
सौ. ऋषिकला दत्तात्रय घोटेकर सरपंच ७०२०४७०१६८
श्री. प्रकाश मोतीराम कडाळे उपसरपंच ९५२७१४०६२६
सौ. अर्चना गणेश आहेर सदस्य ९७६३४५१५०२
श्री. नितीन अशोक कडाळे सदस्य ९११२८२३०२०
श्री. गणेश अंबर तासकर सदस्य ९७३०९८१९४१
सौ. मनिषा रमेश कडाळे सदस्य ७९७२१९७३२५
सौ. निर्मला गोरख घोटेकर सदस्य ७३७८७३२५२५
सौ. संगीता साहेबराव घोटेकर सदस्य ८५३०४१६४३१
सौ. नयना संभाजी दाभाडे ग्रामपंचायत अधिकारी ९४२३१८५१६२

लोकसंख्या आकडेवारी


४६०
२५५६
१३३६
१२२२
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6